गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा द्वारा संचालित गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला ग्रामीण भागातील अत्यंत नामांकित विद्यालय असून या विद्यालयाची स्थापना १९६३ साली कै. तुकाराम्जी मोटघरे यांनी केली. मागे वळून इतिहासाची पाने चाळली असता विद्यालयाचा विकास हळूहळू झालेला आहे. परुंतु आजघडीला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. आनंद जिभकाटे व संचालक मंडळच्या सुयोग्य मार्गदर्शनाने विद्यालयाला स्वतःचे वैभव प्राप्त झाले.
आमच्या विद्यालयामध्ये आजूबाजूच्या गावातील वर्ग ५ ते १२ पर्यंतचे विद्यर्थी शिक्षण घेत असून या विद्यालयात पहेला, वाकेश्वर, रावणवाडी, बोरगाव, चोवा, गोळेवाडी, निमगाव, पागोरा, उसरीपर, सोनेगाव, चिखलपहेला, दवडीपार, गराडा व बासोरा या गावातील विद्यर्थी प्रवेश घेत असतात.
सर्वसोयीनीयुक्त, प्रशस्त वर्गखोल्या, मैदान, संगणक कक्ष, विज्ञान कक्ष, ग्रंथालय, अध्यापक कक्ष, हिरवाकंच बगीचा, बायोमेट्रिक पद्धती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन विद्यालयाचा प्रगतीस भर घालत आहेत.
अधिक वाचावेगळी विशाल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक प्रयोगशाळा
वाचन कक्षामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके उपलब्ध आहेत.
नैसर्गिक प्रकाश आणि ऑक्सिजन प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेंटिलेशनसह शाळेत विशाल वर्ग कक्ष आहे