गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा द्वारा संचालित गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला ग्रामीण भागातील अत्यंत नामांकित विद्यालय असून या विद्यालयाची स्थापना १९६३ साली कै. तुकाराम्जी मोटघरे यांनी केली. मागे वळून इतिहासाची पाने चाळली असता विद्यालयाचा विकास हळूहळू झालेला आहे. परुंतु आजघडीला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड आनंद जिभकाटे व संचालक मंडळच्या सुयोग्य मार्गदर्शनाने विद्यालयाला स्वतःचे वैभव प्राप्त झाले.
आमच्या विद्यालयामध्ये आजूबाजूच्या गावातील वर्ग ५ ते १२ पर्यंतचे विद्यर्थी शिक्षण घेत असून या विद्यालयात पहेला, वाकेश्वर , रावणवाडी, बोरगाव, चोवा, गोळेवाडी, निमगाव, पागोरा, उसरीपर, सोनेगाव, चिखलपहेला, दवडीपार, गराडा व बासोरा या गावातील विद्यर्थी प्रवेश घेत असतात.
सर्वसोयीनीयुक्त, प्रशस्त वर्गखोल्या, मैदान, संगणक कक्ष, विज्ञान कक्ष, ग्रंथालय, अध्यापक कक्ष, हिरवाकंच बगीचा, बायोमेट्रिक पद्धती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन विद्यालयाचा प्रगतीस भर घालत आहेत.
आम्ही विद्यार्थाना सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होण्यास सदैव प्रेरित करीत असतो . सामाजिक व पर्यावरणीय जाणीव ठेवून त्या माध्यमाने स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबवित असतो.
ब्रीद वाक्य:- "ज्ञानमं परमं ध्येयम्"
-प्राचार्य
- श्री. बी.टी. लिल्हारे